महा आवाज News

हर्षवर्धन पाटील यांनी केले कु.पायल देवकाते हिचे अभिनंदन कु. पायल देवकाते हिची विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी..

प्रतिनिधी:- संजय शिंदे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
:- मदनवाडी ता.इंदापूर येथील कुमारी पायल सुलभा पोपट देवकाते हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे.
     त्यामुळे मदनवाडी येथील भिगवण चौकात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दि.२१ रोजी कु.पायल हिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.त्यांच्यासोबत अंकिता पाटील ठाकरे यांनीही तिला शुभेच्छा दिल्या
या अगोदर पायल देवकाते हिने लिपिक, तलाठी, सहकार अधिकारी श्रेणी २, सहकार अधिकारी श्रेणी १, आणि सध्या राज्य आयकर विभागातील   विक्रीकर निरीक्षक पदी तिची निवड झाली आहे.
      या निवडीमुळे मदनवाडी आणि परिसरातून तिचे कौतुक होत आहे.या निवडी पाठीमागे आई-वडिलांची साथ असल्यामुळेच मी या पदापर्यंत जाऊ शकले असे तीने सांगितले.
 यावेळी माजी. मंत्री हर्षवर्धन पाटील,अंकिता पाटील इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक आबासाहेब देवकाते,कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव देवकाते,मदनवाडी चे उपसरपंच राजाभाऊ देवकाते,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी देवकाते,आई सुलभा देवकाते,वडील पोपट देवकाते,यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा