महा आवाज News

शिवभूमी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका साहित्यीका कवयिची,योगिता,यांचे तिसरे पुस्तक” मनातल्या कविता” काव्यसंग्रहाचे प्रकाशन निगडी परिसरात संपन्न!

प्रतिनिधी आटपाडी:-
 सुधीर पाटील 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
आटपाडी :पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने 9 जून 2024 रोजी  निगडी येथील महाराणा प्रताप उद्यान विद्यालयात राजे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त  आयोजित केलेले राष्ट्रभक्ती पर कवितांचा सुरेख संगम काव्यसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले सदर कवी संमेलनाच्या सुरुवातीला त्यांच्या पुतळ्याला हार घालून व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच महाराणा प्रताप यांचा पोवाडा सादर केला गेला  यावेळी निगडी मधील नगरसेवक मा .श्री केंदळे , मा पवळे मॅडम मा जगताप सर मा चिखले सर आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते श्रीमती कोठेकर यांचा सन्मान करण्यात आला .
     
तसेच उपस्थित मा श्री बायस ,प्रकाश देवरे,दिनेश पाटील,माऊली जगताप,जितेंद्र पाटील,प्रविण राजपूत, सुरेश सुर्यवंशी,परीहार मॅडम यांच्या हस्ते प्रथम सत्रात श्रीम कोठेकर योगिता लिखित ‘ मनातल्या कविता काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तसेच त्यांनी  कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर समाजसेवक मा श्री नाणेकर सर ,मा धनंजय इंगळे, मा सामाजिक कार्यकर्ते बायस सर , मा  पुरुषोत्तम हिंगणकरसर ,आम्रपाली धेंडे यांना व्यासपिठावर आमंत्रित केले गेले संमेलनाच्या  आयोजक श्रीम.कोठेकर योगिता  यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांना पुष्प देऊन स्वागत केले.
 तसेच कवी संमेलनाच्या सूत्रसंचालिका मा सौ राजश्री मराठे यांनी आपल्या मधुर आवाजात स्वागत गीत सादर करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि कवी संमेलनाची रंजकता वाढवली त्यानंतर उपस्थित मान्यवर व कवी संमेलनाचे अध्यक्ष पाहुणे यांना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या कवींना प्रमुख पाहुण्यांचे स्थान देण्यात आले नंतर त्यांच्या राष्ट्रभक्तीपर स्वरचित कवितांचे वाचन घेऊन त्यांचा शाल पुष्प सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .
महाराष्ट्रातील  ४० ते ५० मान्यवर सुप्रसिद्ध कवी कार्यक्रमाला उपस्थित होते सुप्रसिद्ध नावाजलेल्या कवींनी एकापेक्षा एक सरस अशा  रचना सादर करून उपस्थित साहित्यिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
दुपार सत्रातील अध्यक्ष मा श्री सिताराम नरके तसेच मा रानकवी वनशिव सर,ॲड उमाकांत आदमाने, चंद्रकांत जोगदंड , प्रतिमा काळे ,श्री राम घडे, मा . राम सर्वगोड, ॲड गायकवाड, दिपीका कटारिया या सर्व मान्यवर कवींच्या हस्ते श्रीमती कोठेकर योगिता लिखित मनातल्या कविता या पुस्तकाचे पुन्हा एकदा प्रकाशन झाले राजयुवा प्रतिष्ठानचे मा योगेश हरणे यांनी स्मृती चिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
रेवती साळुंके, वसूधा नाईक, सुमेत चौधरी ,हेमांगी बोंडे, सुनिता पडवळ, आत्माराम हारे, हेमंत जोशी, गायकवाड मधूकर, राहूल , श्रीखंडे मॅडम,  अश्विनी म्हात्रे,म्हस्के सर, मेहमुदा शेख, आल्हाट सर, अशोक सोनावणे, शांताराम सोनार, उज्वला कुंभार  सूरज अंगुले , राजेश चौधरी  सर्व मान्यवर कवी कवयित्रींनी भरभरून कौतुक केले  त्यांच्या यशाच्या वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत..

इतरांना शेअर करा