महा आवाज News

माजी सभापती स्व.धुळाजीराव झिंबल यांच्या पत्नी रखमाबाई झिंबल यांचे निधन.

प्रतिनिधी:  सुधीर पाटील
आटपाडी:

लिंगीवरे: ता.आटपाडी येथील आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती स्व.धुळाजीराव झिंबल यांच्या पत्नी श्रीमती रखमाबाई धुळाजीराव झिंबल यांचे आज दुपारी १.३०च्या सुमारास वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
सायंकाळी ४.३० ते ५.०० वाजण्याच्या सुमारास लिंगीवरे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्धन झिंबल यांच्या मातोश्री व लिंगीवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुमन झिंबल व श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल यांच्या सासू होत्या.
त्यांच्या पश्चात चार मुले,चार स्नुषा (सुना),नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन शनिवार दि.१६ रोजी सकाळी ७.३०वा लिंगीवरे येथे होणार आहे.

इतरांना शेअर करा