महा आवाज News

माडगुळे गावामधील अनेकांचा शिवसेना-शेंदे गटात प्रवेश.

माडगुळे मधील सर्व विकासकामांना बळकटी देऊ:मा.तानाजीराव पाटील

प्रतिनिधी: सुधीर पाटील..
आटपाडी

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029

आटपाडी :दि.२९ रोजी आटपाडी तालुक्यातील माडगूळे गावातील युवा नेते ग्रामपंचायत सदस्य.अमोल विभुते आणि सामाजिक,राजकीय,जाणकार युवा कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग यांनी माडगूळे गावाच्या प्रगती साठी व विकासासाठी पक्ष प्रवेश केल्याच्या भावना वेक्त केल्या.
आटपाडी तालुक्यात स्व:आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले सर्वांगीण विकास कामे व मा.सुहास बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या पुढाकाराणे मतदारसंघा तील जलद होणारा विकास पाहून येणाऱ्या काळात माडगूळे गावचा विकासाचा बॅकलॉग भरून विकास कामाच्या माध्यमातून माडगुळे गाव पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने शिवसेना (शेंदे गट)या
मध्ये सक्रिय होण्याचा महत्वपूर्ण निर्णय गावातील अनेकांनी घेतला असे अध्यक्ष सतीश विभुते यांनी वेक्त केले.
याप्रसंगी स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नुतन खंडोबा विविध कार्यकारणी सोसायटी मर्यादित माडगूळे या संस्थेचा सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.तानाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.
स्वर्गीय.अनिल (भाऊ)बाबर यांनी तालुक्यातील अनेक भरीव विकास कामे केली आहेत.माडगुळे गावातील सर्व विकासकामे यांना गती देऊ, गावाचा चेहरा-मोहरा बदलू व येणाऱ्या अडचणीचा मार्ग मोकळा करून असे मा.तानाजीराव पाटील यांनी शब्द दिला. कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे-पाटील, सभापती संतोष पुजारी,सुबराव (नाना)पाटील, रामदास सूर्यवंशी,बाळासाहेब होनराव, सोमनाथ गायकवाड, अरविंद चव्हाण,संजय पाटील (वकील),आप्पासो माळी, बजरंग लेंगरे,राजेश नांगरे-पाटील,किशोर जाधव यांचेसह उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ,गुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी माडगूळे मधील बबन पवार, माजी सरपंच बाबुराव विभूते, वसंत विभुते, तुषार विभुते,प्रशांत विभुते, निशांत विभूते, विलास विभुते,सुभाष विभुते,रमेश नसले,चेअरमन सतीश विभुते सर,नूतन सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व सर्व संचालक माडगुळे गावचे आदी मान्यवर मंडळी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहत पार पडला.

चौकट :
माडगुळे ग्रामपंचायत सदस्य.अमोल विभुते मा.महेश लिंगडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य नितीन लिंगडे, सुरेश झोडगे माजी उपसरपंच,राहुल विभुते, मा.उत्तम मंडले, मा.राजेश मंडले मा.महादेव मंडले, माडगुळे सोसायटी संचालक विष्णू लिंगडे, राजेंद्र मलमे,वसंत लिंगडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना शेंदे गटात प्रवेश.

इतरांना शेअर करा