प्रतिनिधी: संजय शिंदे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
मदनवाडी या गावांमधील अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासू लागल्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे तरी या गावांमधील सरपंच.अश्विनी नानासाहेब बंडगर, उपसरपंच.करिष्मा प्रविण सवाने, सर्व सदस्य, सदस्यांनी तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने
पाण्याचा टेंकर मिळण्याची पत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना दिले.तसेच ग्रामपंचायत मदनवाडी व कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहीरीतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे गावातील व वाड्यावस्तीवरिल ग्रामस्थ व जनावरे या करिता तीव पाणी टंचाई भासत आहे.
टेंकर ने पाणीपुरवठा करण्यात यावा ही मागणी सर्व वाडेवस्त्यावरील ग्रामस्थांनी केली यामध्ये देवकातेवस्ती, विरवाडी नं 1, विरवाडी नं 2, बंडगर वस्ती, सकुंडे वस्ती, टँकरने पाणीपुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक संपत तात्या बंडगर, सामाजिक कार्यकर्ते बाळू सकुंडे, मारुती नाना वनवे पत्रकार संजय शिंदे हे उपस्थित होते.