इंदापूरच्या भिगवन येथील शिवप्रेमींची मागणी ..
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
अखंड हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशिष्ट समूहाकडून सातत्याने अवमान केला जातो. ही बाब गंभीर आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शिवप्रेमी तरुणांनी केले आहे.


देशाचा खऱ्या अर्थाने इतिहास अशी ओळख असलेले ऐतिहासिक गड किल्ले येथे अनाधिकृत अतिक्रमण होत आहेत. तसेच या ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्यासाठी काही समाजप्रवृत्ती पुढल्या आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक आहे. यासाठी एक निवेदन तयार करून ते जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विकृत समाजकंटक हे छत्रपती शिवाजी महाराज तसेच काही महापुरुषांचे विटंबना करीत आहेत. पुणे ‘हडपसर’ येथे नुकतीच एक घटना घडली यामध्ये संशयित आरोपीला मनोरुग्ण ठरवण्यात आले.
महापुरुषांचे पुतळे विटंबना तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकां विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी किमान दहा वर्षे सश्रम कारावास अशा स्वरूपाची शिक्षा तरतूद करून कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे येथील शिवप्रेमींनी केली आहे.