महा आवाज News

खरीप हंगाम पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन..

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी  कवडे वस्ती  विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन शेतकऱ्यांना प्रशिक्षण आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे प्रक्रिया करून पेरणी करावी. एकदल पिकासाठी ऍझोटोबॅक्टर व द्विदल पिकासाठी रायझोबियम चा वापर करावा. घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान टाळता येईल बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची पावती घ्यावी . अशा प्रकारचे अनेक प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले.
इंदापुर तालुक्यात बहुतेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.त्यात मान्सून देखील काही दिवसात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने घरगुती बियाणे वापरत असल्यास बियाणे उगवण क्षमता व बीजप्रक्रिया करणे असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ यांनी केले.
 खरीप हंगाम पघरगुती बियाणे उगवणक्षमता केल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल, तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची पावती घ्यावी    व बियाणे पेरणी करताना बॅगमधील बियाणे थोडे शिल्लक ठेवावे ,बॅग ही तळातून फोडावी बॅगवर बॅच न तसेच राहतात ,बियाणे उगवण नाही झाली तर कंपनी वरती तक्रार दाखल करता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन पिसाळ यांनी केले यावेळी कृषी पर्यवेक्षक संतोष सरडे, गोपाळ खंडागळे, कृषी सहाय्यक सचिन मोरे उपस्थित होते.
अशी तपासावी उगवणक्षमता तपासणी सुरवातीला पेरणी करणाऱ्या बियानातील 100 बियाणे घेऊन एक गोणपाट ओले करून घ्यावे.त्यामध्ये दहा ओळी करून हे 100 बियाणे मांडणी करून घ्यावी व ते गोणपाट ओलसर राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी 100 बियापकी किती उगवले हे तपासावे यातील समजा सत्तर बियाणे उगवले तर बियाण्याची क्षमता सत्तर टक्के उगवले असे समजुन पेरणी करताना अधीक बियाणे पेरणी करावी, यामध्ये उगवण क्षमता तपासणी केल्यामुळे शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान टाळता येते.
या प्रशिक्षणासाठी म्हसोबावाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा