प्रतिनिधी- जितेंद्र नेमाडे ,दौंड.
आज दिनांक 10 मार्च 2024 रोजी ग्रामपंचायत खानवटे व पंचायत समिती दौंड आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त मोफत महिलांचे सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सौ.अंजलीताई रंगनाथ ढवळे. सरपंच – ग्रामपंचायत खानवटे तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरामध्ये 453 आरोग्य तपासणी ,हिमोग्लोबिन तपासणी ,रक्तदाब तपासणी , रक्तातील साखर तपासणी, करून औषधोपचार करण्यात आले सदर शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव येथील माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री. मोहन पांढरे ,औषध निर्माता अधिकारी -धनंजय बगाडे, महिला आरोग्य सहाय्यक अनिता छत्रीकर, श्री पानसरे ,श्री आप्पा धायतोंडे, सौ माया काळे ,लॅब टेक्निशन श्री खरात व श्री वनवे व प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे येथील मॅडम स्नेहा व सर्व कर्मचारी यांच्यामार्फत कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रम 100% यशस्वी झाल्याचे रावणगावचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहन पांढरे यांनी सांगितले