महा आवाज News

कांद्याचे दर होणार कमी..

सरकारच्या कांदा खरेदीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना..

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

काही दिवसांपासून कांद्याच्या भावा मध्ये चालू असलेल्या घसरणीमुळे तसेच शासकीय निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना मोठा बसत आहे.

कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो पण शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होणार आहे.

सरकारने कांदा निर्यातीवर बंदी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून बंपर स्टॉप द्वारे लाखो टन कांदा खरेदी करत आहे त्यामुळे कांदा भाव आटोक्यात येऊन ते स्वस्त होतील सरकार बंपर स्टॉक द्वारे शेतकऱ्यांना पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे.

सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ ला रब्बी हंगामासाठी कांदा खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा स्वस्त मिळू शकतो.

कृषिमंत्र्यांच्या माहितीनुसार या वर्षी रब्बी हंगामात १९०.५ लाख टन कांद्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे गेल्या वर्षीच्या २३७ लाख टनाच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे २० टक्के कमी असेल देशात वर्षभर कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रब्बी हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे हे वार्षिक उत्पादनाच्या सुमारे ७५ टक्के आहे.

सरकारने गेल्या आठवड्यात निर्णय घेतला की पुढील आदेश येईपर्यंत बंदी कायम राहील मागच्या वर्षी नाफेड आणि एनसीसीएफने बंपर स्टॉप तयार करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार बाजारात सोडण्यासाठी सुमारे ६.४ लाख टन कांदा खरेदी केला होता याच खरेदीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला त्या खरेदीत सरासरी १७ रुपये प्रति किलो भाव मिळाला होता आता तो साठा जवळपास संपला आहे सध्या महाराष्ट्रात सरासरी गाव किंमत १३ ते १५ रुपये प्रति किलो आहे.

इतरांना शेअर करा