प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातील अनेक काना कोपऱ्यातून खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात.
जेजुरीचा खंडेराया हे अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. येथे विविध यात्रा आणि उत्सव मोठ्या उत्साहात होत असतात. त्यातलाच एक उत्सव म्हणजे सोमवती अमावस्या या सोमवती अमावस्याला मोठ्या संख्येने भाविक लाखोच्या संख्येने या गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात. आता दोन दिवसानंतर सोमवती अमावस्या आहे.
या अमावस्याला खंडेरायांच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले जाते आणि यावेळी लाखोच्या संख्येने भावी तिथे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तसेच जेजुरी ट्रस्ट चे व्यवस्थापक यांचे नियोजन योग्य प्रकारे केलेले असते. सर्व भाविकांना योग्य प्रकारे दर्शन मिळणार आहे तसेच पोलीस प्रशासन चांगले सहकार्य करणार आहेत असे वक्तव्य जेजुरी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अनिल रावसाहेब सोंदडे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले.