महा आवाज News

वेल्हाळे गावात परंपरेपेक्षा वेगळ्या पद्धतीने होळीचा सण साजरा ..

भुसावळ पासून जवळच असलेल्या वेल्हाळे गावात होळी चा सण पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी:- गोकुळ चौधरी..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यसनांची आणि अमली पदार्थांची प्रतीकात्मक होळी पेटविण्यात येवून हा सण उत्साहाने साजरा झाला.

पारंपरिक पद्धतीमध्ये मोठ मोठी लाकडे, गोवऱ्या आणि एरंडाचे झाड ज्याला होळीचा दांडा म्हणतात तो न वापरता थोड्याशा बारीक काड्या एकमेकांशी बांधून उभ्या करण्यात आल्या त्याला सिगारेट, गुटखा, तंबाखू, जर्दा, खर्रा, बिडी हे शब्द लिहिलेले रंगीत कागद लावण्यात येवून या अमली पदार्थांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. या मुळे लाकडे आणि गोवऱ्या ह्या दोघांची ही बचत झाली. होळी साठी एरंडाचे झाड वापरण्यात आले नाही. जाळण्यासाठी गोवऱ्यांचा वापर हो टाळण्यात आला.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे चिटणीस श्री चंद्रकांत चौधरी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे सदस्य डॉ दयाघन एस राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आपल्या भाषणात डॉ दयाघन राणे यांनी सांगितले की व्यसनाची समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चाललेली आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोक मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. प्रतीकात्मक दहनाच्या संदर्भात बोलताना डॉ राणे म्हणाले की अमली पदार्थांची होळी केली तर ते जाळून त्यांच्या धुराचे प्रदूषण वातावरणात होणार च आहे. ज्यामुळे हे अमली पदार्थ सेवन न करणरानां ही त्याचा त्रास होणारच आहे. त्या पेक्षा अमली पदार्थांचे नाव असणारे कागद होळी ला लावल्यास होळी पेटायला मदत होईल. आणि अमली पदार्थांचे प्रतीकात्मक दहन हीं होईल. नशाबंदी मंडळाचे चिटणीस श्री चंद्रकांत चौधरी म्हणाले की वेल्हाळे गाव हे एक आदर्श गाव आहे. कारण या गावाने बियर बार उघडण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येथील ग्रामपंचायत कार्यालयाने कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या विक्रीसाठी असणाऱ्या दुकानाला गावात परवानगी दिलेली नाही. आणि अमली पदार्थांचा वापर गावात कोणी करणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

उपस्थित पाहुण्यांच्या संबोधनानंतर वेल्हाळे येथील लोकनियुक्त सरपंच शारदाताई कोल्हे, भुसावळ येथील प्रख्यात समुपदेशक सौ आरती चौधरी तसेच व्यसनमुक्ती केंद्र संचालक डॉ वंदना वाघचौरे या तिघींच्या हस्ते होलिका दहनसाठी अग्निडाग देण्यात आला.

या प्रसंगी भुसावळ रोटरी क्लब चे सदस्य श्री सारंग चौधरी, वेल्हाळे येथील उपसरपंच श्री हेमंत पाटील, आकाश कुरकुरे उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे स्वागत सरपंच शारदाताई कोल्हे आणि उपसरपंच हेमंत पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तिका देवून करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीते साठी आकाश कुरकुरे, या तरुणांनी प्रयत्न केले. ग्राम पंचायत कार्यालयाच्या समोर आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमात वेल्हाळे गाव चे ग्रामस्थ आणि ग्राम पंचायत वेल्हाळे चे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

इतरांना शेअर करा