भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय…
संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर येथे तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी(दि.19) वाघ पॅलेस येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी दिली.

या मेळाव्यास बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार उपस्थित राहणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासंदर्भात अजित पवार व हर्षवर्धन पाटील हे दोन मान्यवर नेते मेळाव्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तरी या मेळाव्यास भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी आवाहन तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले आहे. दरम्यान, या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आदी पवार कुटुंबातील सदस्य हे भाग्यश्री निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील व कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.