हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा स्पर्धा परीक्षेचा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता असे उपक्रम महत्त्वपूर्ण – प्राचार्य डॉ. जीवन सरवदे .
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आयोजित ‘मला आय.ए.एस. व्हायचंय ‘या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कला शाखेवर आधारित, चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, तसेच भाषा विषय या घटकावर भर देण्यात आला.
प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा हा अनोखा व अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भातील उजळणी तसेच त्याविषयीची सर्वांगीण माहिती उपलब्ध होण्यासाठी असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.’
उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस महाविद्यालयात अनेक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो.’
डॉ. शिवाजी वीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. भिमाजी भोर, प्रा.कल्पना भोसले,प्रा.सुनील सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. राजीव शिरसट यांनी मानले.