अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला दिले निवेदन..
     
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरात साठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती याठिकाणी काल एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तिला विषारी औषध पाजले, यामुळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अनुषंगाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करणे बाबतचे निवेदन भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला दिले.
अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या खूपच भयानक असून या घटना थांबल्या पाहिजेत. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात मुली, महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेवर संताप व्यक्त होत आहे.
यामुळे या प्रकरणात लक्ष घालून याबाबत पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत आरोपीला कठोर शिक्षा होईल याबाबत प्रयत्न करावेत यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.