प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष- विश्वासराव कृष्णाजी रणसिंग यांच्या दि. २५ जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त “विश्वासराव रणसिंग महाविद्यालय” कळंब वालचंदनगर ता.इंदापूर जि.पुणे या महाविद्यालयात प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर ता. बारामती येथील प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांची निवड केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी दिली.
या जयंती निमित्ताने संस्था संचालित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी व माध्यमिक विद्यालय तावशी येथे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. महाविद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे.
तरी पंचक्रोशीतील युवकांना आव्हान करण्यात येते की, आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपण रक्तदान करावे व सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हावे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. आपण प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवावा हीच अपेक्षा आहे. कारण आपले रक्तदान हे दुसऱ्याचे जीवनदान ठरू शकते.
तसेच महाविद्यालयात २००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपळ,लिंब,कवठ,बांबू,
सीताफळ,पेरू,भेंडी, सुबाबळ, पेल्टीफार्म,अशोक, उंबर, कदंब,चिंच,करंज अशा अनेक प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. अशी माहिती ग्रीन क्लब प्रमुख प्रा. राजेंद्रकुमार डांगे आणि समन्वयक डॉ.तेजश्री हुंबे यांनी दिली. तरी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.असे आव्हान संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग, प्रभारी प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी केले आहे.