महा आवाज News

शेकडो मुस्लिम तरुणांना नोकरी देत मुस्लिम समाजाला न्याय दिला : हर्षवर्धन पाटील

– जंक्शन येथे हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित इफ्तार पार्टी संपन्न !

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – हर्षवर्धन पाटील

प्रतिनिधी:- संजय शिंदे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029

इंदापूर तालुक्यामध्ये गेली 75 वर्षांपासून हिंदू-मुस्लीम समाज एकोप्याने व बंधुभावाने राहत असून, पिढ्यान-पिढ्या एकमेकांना सुख दुखात साथ देत आहे. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा हा राज्यामध्ये आदर्श असा आहे, असे गौरोदगार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जंक्शन (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि.2) काढले.

जंक्शन येथे नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टी उत्साही वातावरणात वातावरण संपन्न झाली. या इफ्तार पार्टीचे आयोजन कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक वसंतराव मोहोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर व मोहोळकर कुटुंबियांनी केले होते. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात सन 1952 पासून कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप, मोहोळकर गुरुजी यांनी सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन राजकारण, समाजकारण करण्याची शिकवण आंम्हा कार्यकर्त्यांना दिली आहे. त्या शिकवणीनुसार सर्व समाजाला बरोबर घेऊन जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आपण राजकारण समाजकारण करीत आहोत. कुठलाही धर्म हा प्रथम मानवतेची शिकवण देतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

महंमद पैगंबर यांनी इतरांना मदत करा, अशी माणुसकीची शिकवण दिली आहे. कुराणा मध्ये सेवा करण्यास महत्त्व दिले आहे. रोजा चा शारीरिक क्षमता सुधारण्यास मदत व्हावी, असा हेतू आहे. सर्वधर्मियांची एकजूट ही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. या काळात अल्लाहकडे घातलेल्या साकड्याचे फळ प्रत्येकाला चांगले मिळते. अल्लाह आपणा सर्वांना निरोगी आरोग्य देवो अशी सदिच्छा व्यक्त करीत, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.

या इफ्तार पार्टीचे उत्कृष्ट आयोजन केलेबद्दल वसंतआबा मोहोळकर, रोहित मोहोळकर व मोहोळकर कुटुंबियांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर, अजितभाई मुलाणी, बबलू पठाण यांची भाषणे झाली. यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार अँड. शरद जामदार, वसंतराव मोहोळकर, प्रदीप पाटील, राजेंद्र गायकवाड, सत्यशील पाटील, अंकुश रणमोडे, उद्धव माने, विजय मचाले, महेश खराडे, दादाभाई मुलाणी, समसूद्दीन मुलाणी, समीरभाई मुलाणी, रसूलभाई पठाण, दत्तात्रय साळुंखे, सुधाकर कणसे, विलास पवार, ऋषिकेश मोहोळकर, नाना गोसावी, श्रीकांत मोहोळकर, सतीश भोसले, इंन्नूसभाई व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा