महा आवाज News

परभणी येथील घटनेचे पडसाद अनेक जिल्ह्यांमध्ये..

इंदापूर येथील वालचंद नगर बावडा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने १० डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजे दरम्यान विटंबना केली.

या घटनेच्या निषेधार्थ मौजे रेडणी ता. इंदापूर येथे वालचंदनगर बावडा रस्त्यावर दिनांक १२/१२/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता रेडणी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अजय चव्हाण, हनुमंत चव्हाण, दादा सोनवणे, संदीप पानसरे, सचिन काळकुटे, प्रशांत बरकडे, अमोल भाळे, रोहन ढोले, माऊली नायकुडे, राजेश चव्हाण, संजय लोंढे, गणेश चव्हाण, महादेव चव्हाण, ऋषिकेश देवकर, मसू माने यांनी सहभाग घेतला.
सदर आंदोलनाचे निवेदन बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किसन कांनतोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सलगर,लाखेवाडी मंडल अधिकारी सतीश गायकवाड व तलाठी संदीप मैलागिरे यांनी पोलीस पाटील महेंद्र पडळकर यांचे उपस्थितीत स्वीकारले व आंदोलन शांततेत पार पडले.

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप जनक वातावरण झालेले आहे. या घटनेमुळे आज परभणी बंद करण्यात आले होते. याचे तीव्र पडसाद जिल्‍हाभर उमटले, अनेक शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी मोर्चा काढण्यात आले. अनेक ठिकाणी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

इतरांना शेअर करा