प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर जनसेवा पत्रकार संघाची दि.(९) रोजी इंदापूर विश्रामगृह येथे नुकतीच मासिक सभा पार पडली.यामध्ये खजिनदार,कार्याध्यक्ष,आणि संघटक या पदांची सर्वांनूमते निवड करण्यात आली.
बबनराव धायतोंडे यांचे पुणे जिल्ह्यातील पत्रकारितेच्या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेत आणि पत्रकारितेचे धडाडीचे काम पाहता इंदापूर जनसेवा पत्रकार संघाने बबनराव धायतोंडे यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांना इंदापूर जनसेवा पत्रकार संघाच्या संघटक पदी त्यांची निवड केली.
यावेळी बबनराव धायतोंडे म्हणाले की इंदापूर जनसेवा पत्रकार संघाच्या संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील.आणि संघटनेच्या माध्यमातून सामाजिक,लोकाभिमुख काम केले जाईल.आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अधिकचा वेळ दिला जाईल. त्यांच्या या नवडीने त्यांचे इंदापूर तालुक्यासह दौंड तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.