महा आवाज News

इंदापूर महाविद्यालयात रंगली काव्यमैफिल..

प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
  इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमधील कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 ऑगस्ट 2024 रोजी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
 
इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे ,उपप्राचार्य  प्रा.दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले  की, ” विद्यार्थ्यांमध्ये कविता रुजविण्यासाठी तसेच त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत”.
विद्यार्थ्याबरोबरच प्रा.संतोष पानसरे , प्रा.राजीव शिरसट , प्रा. अमित दुबे , प्रा.कल्याणी देवकर , प्रा.शरद पवार, प्रा.अभिजित भोसले, प्रा.प्रसाद गायकवाड यांनी देखील  कविता सादर केल्या.
 काव्य-वाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. युवराज फाळके, प्रा.अभिजीत भोसले, प्रा.शरद पवार आणि प्रा.कल्याणी देवकर यांनी कार्य केले.
प्रा.भारत शेंडे, प्रा.सुनील सावंत, प्रा.आबासाहेब घोळवे, प्रा.रवींद्र हगवणे,प्रा.हर्षवर्धन सरडे, प्रा.सागर गुजराथी,प्रा.रवींद्र साबळे, प्रा.अमोल मगर, प्रा.रोहिदास भांगे उपस्थित होते.
    प्रा.संतोष पानसरे यांनी काव्यवाचन स्पर्धेचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

इतरांना शेअर करा