प्रतिनिधी:- संजय शिंदे…
कळस-वालचंदनगर गटाचा जंक्शनला तर निमगाव-निमसाखर गटाचा निमगावला शुक्रवारी मेळावा.
भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवारी (दि.1)
कळस-वालचंदनगर गटातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा जंक्शन येथे 4 वाजाता, तर निमगाव-निमसाखर गटाचा मेळावा निमगाव केतकी येथे सायंकाळी 6.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.
संकल्प 2024 संकल्प विजयाचा या अभियानांतर्गत जंक्शनचा मेळावा रोहित मंगल कार्यालयात तर निमगाव केतकीचा मेळावा संत सावता माळी मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
या मेळाव्यांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अन्य भाजप नेते मार्गदर्शन करणार आहेत. तरी भाजपचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले आहे.