महा आवाज News

‘जनसुरक्षा कायद्या’ विरोधात दौंडमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार आंदोल..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: – 9373004029
सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना दडपशाहीने अटक करण्याच्या तरतुदी असलेल्या ‘जनसुरक्षा कायद्या’ विरोधात दौंड शहरात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवारी, १० सप्टेंबर रोजी संविधान स्तंभासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रस्तावित विधेयकामुळे लोकशाही धोक्यात येत असून, नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या कायद्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जाईल. त्यामुळे हे विधेयक तत्काळ मागे घेण्यात यावे.”
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,अनिल सोनवणे,उपजिल्हा प्रमुख शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे),हरेष ओझा दौंड शहर प्रमुख काँग्रेस, रविंद्र जाधव तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी आणि लोकजनशक्तीपक्षांचे प्रमुख नेते सचिन गायकवाड दौंड शहर अध्यक्ष,मनिषा सोनवणे, चैतन्य पाटोळे,अमित पवार,दिपक पारदासणी, श्रेयस सोनवणे,अनिल भालेराव व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला, आंदोलनानंतर या सर्व पक्षांच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन व तहसीलदार दौंड यांना निषेध नोंदवणारे निवेदन सादर करण्यात आले.

इतरांना शेअर करा