प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
दौंड (जि. पुणे) विधानसभा मतदार संघाशी निगडीत जलसंपदा विभागाच्या विविध विषयांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
१) जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल त्यासाठी आवश्यक अहवाल संबधित विभागाने तयार करावेत असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले.
२) खडकवासला ते फुरसुंगी बंदनळी कालवा कामासाठी राज्य शासनाकडून २२०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून त्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे आवश्यक पर्यावरण व वन विषयक मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले असून तातडीने काम सुरु करण्याचे आदेश दिले.
३) जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) अस्तरीकरण व दुरुस्तीसाठी सुमारे १८० कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेला असून त्याची सुरु असलेली कामे गतिमान करावीत व शेतकऱ्यांच्या आवर्तनावर परिणाम होणार नाही याची देखील काळजी घावी अशा सूचना केल्या
४) पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या मौजे कुपटेवाडी, ता. दौंड, जि. पुणे येथील वितरिकेच्या वरील बाजूस वंचित भागाच्या सिंचनासाठी नवीन पाईप लाईन करणेसाठी सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे १७.४३ लक्ष निधी उपलब्ध झाला असून, पुढील महिनाभराच्या आत सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच नव्याने समविष्ट करायचे तलाव समाविष्ट करून जास्तीत जास्त वंचित भागाला पाणी देण्यात यावे अशा सूचना केल्या
५) चिबड, खारवट व पाणथळ शेतजमिनी निर्मुलन करण्यासाठी धोरण ठरविणे व दौंड (जि. पुणे) तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण करून प्रस्ताव सादर करून त्यास मान्यता मिळण्यासाठी मापदंड मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर सुरु असून, वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर याबाबत प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल असे मा. मंत्री यांनी सांगितले
६) दौंड (जि. पुणे) तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅंक वॉटर क्षेत्रात नवीन बॅरेजेस बांधणेसाठी सुधारित धोरण ठरविण्याची मागणी केली – त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, यामुळे दौंड, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याने तातडीने कार्यवाही करावी असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले
७) मुळा मुठा व भीमा नदीवर अस्तित्वात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत हे सर्व बंधारे अतिशय जीर्ण झालेले असून सर्वच बंधारे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना मान्यता देण्यात यावी असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले
८) पुणे महानगर पालिकेची पाणी वितरण व्यवस्था सुधारणे व त्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय कमी करणे, वापरलेले पाणी प्रक्रिया करून पूर्ण क्षमतेने शेतीला देणे पाणी वापर नियंत्रित करणे आदी गोष्टीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण करणे व अस्तरीकरण करणे या कामासाठी सुमारे ४३८.४८ कोटी रुपयांच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता. जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे आभार मानले
यावेळी अपर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर साहेब, कार्यकारी संचालक श्री. अतुल कोपोले साहेब, प्रकल्प समन्वयक श्री. संजय बेलसरे साहेब, मुख्य अभियंता श्री. हनुमंत गुनाले साहेब, श्री. हनुमंत धुमाळ साहेब यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.