महा आवाज News

एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी, श्री श्रीनाथ शेलार व सचिन पदी दादासाहेब साळवे यांची प्रचंड बहुमताने निवड…

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

बारामती आगाराच्या,एस टी कामगार संघटनेच्या 2025 सालच्या झालेल्या वार्षिक निवडणुकीत,अध्यक्ष पदी श्री श्रीनाथ शेलार व सचिव पदी श्री दादासाहेब साळवे यांची बहुमताने निवड झाली आहे.

बारामती आगारात अध्यक्ष आणि सचिन पदासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुद्धा, दोन्ही पदाची निवड बिनविरोध करण्यासाठी, दोन्ही गटा कडील प्रमुख नेत्यांनी शेटपर्यन्त प्रयत्न केले, पण ते अयशस्वी झाले, या निवडणुकी मध्ये सचिव पदाचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या लढती कडे संपुर्ण पुणे विभागाचे लक्ष लागून राहिले होते, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढती मध्ये, श्री दादासाहेब साळवे, यांनी श्री राजेंद्र पवार यांचा मोठया मताधिक्याने परभव केला आहे .तसेच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्री श्रीनाथ शेलार यांच्या कडून विरोधी उमेदवार श्री दिनेश खोडके यांचा दारुण पराभव केला आहे .

सदर निवडणूक हि अतिशय शांतता पुर्ण वातावणात पार पडली आसून निवडणूक मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, श्री शाहीद सय्यद, (सोसायटी संचालक),श्री, प्रकाश काळभोर,श्री रविद्र कांबळे,, श्री सोनबा वाडकर,, श्री, बापूराव पवार, श्री विकास भोसले, श्री राजेंद्र गवंडी, श्री विकास सावंत तसेच संग्राम कोंढाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले,या सर्वांच्या सहकार्याने, निवडणूक शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली पाहण्यास मिळाली आहे.निकाल घोषित झाल्यानंतर आगारात DJ लाऊन आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे .

उपस्थित सर्वांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.निवडणूक प्रक्रियेत श्री सोमनाथ लोखंडे, श्री सचिन मोरे, श्री सागर दिघे, श्री बाळासाहेब काशीद यांनी निवडणूक अधिकारी यांची भूमिका प्रामाणिक पणे बजावलेली पाहायला मिळाली .

येणाऱ्या काळात, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे, तसेच सरचिटणीस श्री हनुमंत ताटे,विभागीय अध्यक्ष श्री मोहन जेधे, व विभागीय सचिव, श्री दिलीप परब यांच्या मार्गदर्शना खाली कामगारांच्या प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवून,कामगारांना न्याय आणि दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे वक्तव्य
अध्यक्ष श्री श्रीनाथ शेलार
सचिव दादासाहेब साळवे यांनी केली आहे.

इतरांना शेअर करा