महा आवाज News

बिबट्याच्या हल्ल्यामुळे घोड्याचा मृत्यू..

प्रतिनिधी महेश झिटे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
     पेडगाव या ठिकाणी माननीय. श्री. सचिन जगताप यांच्या शेतात पारंपारिक व्यवसाय करणारी खोरवडी गावचे बकरी सांभाळणारे माननीय.श्री.भागोजी शिंदे यांच्या घोड्यावरती पहाटे बिबट्याने हल्ला केला.त्यामध्ये घोडामृत पावला त्याची माहिती संबंधित खात्यात पंचायत समितीचे सभापती मा .श्री.गणेश झिटे यांनी सविस्तर माहिती देऊन वनविभाग अधिकारी मा.मोरे मॅडम यांना बोलवून पंचनामा करून घेतला आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात मॅडमची चर्चा केली पेडगाव या ठिकाणी बिबट्याचा बरेच दिवसापासून वावर आहे.
      या ठिकाणी पेडगावचे ऊस बागायत क्षेत्र मोकळे झाले असल्याकारणाने बिबट्याचा  वावर होताना दिसत आहे पेडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकरी रात्री बाहेर पडण्यास भीत आहे त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर कारवाई करून त्याचा बंदोबस्त करावा अशी पंचायत समिती ची सभापती.
     गणेश झिटे आणि पेडगाव ग्रामपंचायत चे माजी. उपसरपंच .भाऊसाहेब गोधडे गोकुळ गोधडे निखिल झिटे अभिजीत (भैया )गावडे ऋषिकेश गोधडे ओम गोधडे सुहास झिटे हे सर्व उपस्थितीत होते

इतरांना शेअर करा