राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली..
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
विधानसभेच्या निवडणुकी वेळी बारामतीतील पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना शब्द दिला होता. पण वेळ आल्यावर ते फिरले आल्यामुळे बारामतीच्या पवारांनी पाठिंत खंजीर खुपसला असा आरोप हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक वारंवार करत होते.
त्याला समर्थन म्हणून किंवा हर्षवर्धन पाटील यांची समजूत घालण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत का अशीच चर्चा इंदापूर मध्ये रंगलेली पाहायला मिळाली.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत संवाद साधला आहे.पक्षाच्या प्रती समर्थन पणे हर्षवर्धन पाटील काम करत आहे आणि करत राहणार असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.