महा आवाज News

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गौरी पूजन व महानैवेद्य!..

भाग्यश्री निवासस्थान गर्दीने फुलले ! 
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी जेष्ठा गौरी पूजनाचा विधी व महानैवेद्याचा कार्यक्रम बुधवारी (दि.11) उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. दरम्यान, भाग्यश्री निवासस्थानी गौरीची आकर्षक सजावट करून पर्यावरण पूरक असा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या घरी परंपरेनुसार गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावरती विधिवत पद्धतीने साजरा केला जातो. भाग्यश्री निवासस्थानी गौरीचे मंगळवारी आगमन झाल्यानंतर इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरीची आकर्षक सजावट व पर्यावरण पूरक सुंदर देखावा साकारण्यात आला आहे.
तसेच गौरी पूजनानिमित्ताने बुधवारी गौरी-गणपतीचे पूजन, महानैवेद्य व आरती आदी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्रीमती सुमन झांबरे, भाग्यश्री पाटील, निहारजी ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गौरी पूजनच्या निमित्ताने भाग्यश्री निवासस्थानी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम भाग्यश्री पाटील अंकिता पाटील ठाकरे यांच्या उपस्थिती संपन्न झाला.
तसेच बुधवारी सायंकाळी शेकडो महिला व नागरिकांनी गौरी-गणपतीचे दर्शन घेतले व प्रसादाचा लाभ घेतला. या सर्वांचे हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील यांनी स्वागत केले. दरम्यान, गौरी-गणपती पूजनच्या निमित्ताने भाग्यश्री निवास्थान बुधवारी सायंकाळी महिला व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

इतरांना शेअर करा