महा आवाज News

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहाजीनगर व इंदापूरात अभिष्टचिंतन सोहळा!

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहाजीनगर व इंदापूरात अभिष्टचिंतन सोहळा!
-अंकिता पाटील ठाकरे यांची माहिती ..
प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 21) शहाजीनगर व इंदापूर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले आहे. परस्परांचा आनंद, आपुलकी व स्‍नेहभाव वृद्धिंगत होणाऱ्या या  अभिष्टचिंतन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे.
ऐतिहासिक इंदापूरचे सुसंस्कृत नेतृत्व असलेले हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा आनंद, नवी उमेद निर्माण करणारा व ऊर्जा देणारा असा असणार आहे. यानिमित्ताने आपणा सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी हर्षवर्धन (भाऊ) पाटील हे शहाजीनगर येथील भाग्यरत्न सांस्कृतिक भवन – निरा-भीमा सहकारी साखर कारखाना येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वा.पर्यंत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर इंदापूर येथील श्री वाघ पॅलेस पुणे-सोलापूर हायवे या ठिकाणी सायंकाळी 4 ते रात्री 9 वा. पर्यंत उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही ठिकाणी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी शहाजीनगर व इंदापूर येथे होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे स्नेह निमंत्रण भाग्यश्रीताई पाटील, अंकिता पाटील ठाकरे व राजवर्धन पाटील यांनी दिले आहे.

इतरांना शेअर करा