महा आवाज News

हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!

प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
             
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, राज्याचे माजी मंञी हर्षवर्धन (भाऊ) पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण उत्साही व आनंदी वातावरणात सोमवारी (दि.19) साजरा केला.
   
यावेळी हर्षवर्धन पाटील यांना श्रीमती पद्माताई भोसले, चिञा कोरटकर, चेतना मोटे, सुजाता बागल, वर्षा जाधव, माधुरी माने, मौसमी कोरटकर या बहिणींना औंक्षण करून राख्या बांधल्या तसेच निरोगी व उत्तम दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त केली. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि प्रेमाचे असते. या सर्व बहिणींना हर्षवर्धन पाटील यांचे समवेत उदयसिंह पाटील, किरण पाटील, मयुरसिंह पाटील या बंधूनाही राख्या बांधून औक्षण केले.
तसेच निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांना रक्षाबंधन उत्सवानिमित्त जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी राखी बांधून औक्षण केले व आशीर्वाद दिले.

इतरांना शेअर करा