बारामती लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी उद्या सागर बंगल्यावर बैठक.
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे
राज्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा महायुती मधील कोणत्या पक्षाला सुटेल हे अजून जाहीर झाले नाही.
मात्र जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर हर्षवर्धन पाटील यांची भूमिका काय असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती गंभीर आरोप करत विरोध दर्शवल्याने सदर बाबतीत तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हर्षवर्धन पाटील यांना फोन आला असून हर्षवर्धन पाटील यांना उद्या सागर बंगल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उभ्या असतील असे संकेत मिळत आहेत. तसा प्रचारही अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघात केला जात आहे. मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुक वेळी याच बारामतीच्या पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना शब्द देऊन ऐनवेळी फिरवल्याने बारामतीच्या पवारांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप हर्षवर्धन पाटील समर्थक वारंवार करत आहेत.
जर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अथवा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सुटली तर त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास हर्षवर्धन पाटील समर्थकांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या उमेदवारापुढील अडचणीत वाढणार आहेत .
त्यामुळे या सदर बाबतीत तात्काळ तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हर्षवर्धन पाटील यांना फोन करून उद्या सागर बंगल्यावर तोडगा काढण्यासाठी व चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवारांच्या उमेदवार पत्नीचा धोका टाळण्यासाठी व हर्षवर्धन पाटील यांना बळ देण्यासाठी कोणाचे टेन्शन वाढणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.