महा आवाज News

गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल रस्त्याकडे जाण्यासाठी डिवाइडेड फोडून मिळण्याची मागणी..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल रस्त्याकडे जाण्यासाठी नगर पुणे हायवे वरून अधिकृत डीवायडर फोडून देण्यात यावा… मनसे नेते रविश रासकर यांची मागणी..
गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल ही शाळा नगर पुणे हायवे लगत असल्याकारणाने तेथे येण्या जाण्यासाठी डिव्हायडर नाही. आणि सर्व बसेस, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी यांना पेट्रोल पंप एमआयडीसी चौकातून शाळेपर्यंत विरुद्ध दिशेने जीव घेणा प्रवास दररोज करावा लागतो.
त्यामुळे मनसेचे नेते रविश रासकर यांना गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूल च्या व्यवस्थापकांनी ही शोकांतिका सांगितली. त्यानंतर रविश रासकर यांनी त्यांची तक्रार ऐकून घेत त्यानंतर सुपा टोल नाका आणि बांधकाम विभाग यांना हा अधिकृत डिव्हायडर फोडून देण्यासाठी व त्या ठिकाणी डिव्हायडर फोडून देऊन त्या रस्त्यावर स्पीड बेकर करून विद्यार्थ्यांना व जाणार येणाऱ्या पालकांना, शाळेच्या बसेस ला मार्ग मोकळा  करण्यासाठी पत्र दिले.
तसेच या निवेदनावर जर त्यांनी गुरुदेव सेमी इंग्लिश स्कूलला मार्ग न काढल्यास नगर- पुना  हायवेवर हॉटेल, पेट्रोल पंप व इतर ठिकाणी तोडण्यात आलेले अनाधिकृत डिव्हायडर हे तत्काळ काळ बंद करण्यात यावे . अशा प्रकारे निवेदन सुपा टोलनाका खोसे साहेब आणि कार्यकारी अभियंता साहेब जाधव साहेब यांना देण्यात आले.

इतरांना शेअर करा