महा आवाज News

ग्रा.पं. दगडवाडी च्या सरपंचपदी भाजपच्या सुशीला रासकर -हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार ..

इंदापूर : प्रतिनिधी :  संजय शिंदे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
       दगडवाडी (ता. इंदापूर) ग्रा.पं.च्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या सुशीला दत्तात्रय रासकर यांची सोमवारी दि.8 बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच सुशीला रासकर यांचा इंदापूर येथे बुधवारी (दि.10) सत्कार करण्यात आला.
           यासत्कार प्रसंगी माजी सरपंच रामदास  रासकर, उपसरपंच दत्तात्रय पोळ, राजू सूळ, मनोज निंबाळकर, आप्पा पारेकर, सचिन रासकर (चेअरमन), हनुमंत रासकर, तानाजी रासकर, संदीप गायकवाड, रमेश दुधाळ, स्वाती पारेकर, किसन मोटे, लक्ष्मीबाई कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते. दगडवाडी ग्रामपंचायत भाजपचा बालेकिल्ला आहे. गावच्या विकासासाठी आगामी काळात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इतरांना शेअर करा