वन अधिकार्याच्या आशिवार्दामुळे कोळसा भट्ट्या जोमात..
मोरगाव येथे चंदनाची झाडे जाळून कोळशाची चोरी..
संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामती वन विभागाचे चालले तरी काय? कुंपणच खात आहे शेत!!
संबंधित प्रशासन अधिकारी गप्प का? सर्वसामान्यांचा प्रश्न..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या बारामतीत वन विभागात सरस चालू आहे भ्रष्टाचार. दलाला प्रमाणे चंदनाची झाडे तोडून कोळसा बनवून होत आहे विक्री..गेले अनेक वर्षापासून वन आधिकारी एकाच ठिकाणी खुर्चीला चिकटून बसलेले आहेत. त्यांच्या बदल्या का होत नाही सर्वसामान्यांचा प्रश्न..
बारामती येथील वन विभागात वन अधिकार्यांच्या आशिवार्दामुळे कोसळा भट्ट्या जोमात असल्याची तक्रार देवून ही याबाबत आजमितीस कोणतीही कारवाई होत नसल्याबाबतचा खेद अनिल गुणवरे यांनी व्यक्त केला आहे. दि.6 एप्रिल 2024 रोजी नागपूर येथील वनबल प्रमुख यांना बारामती वनपरिक्षेत्रातून अवैध वृक्षतोड करून लाकडी कोळसा तयार करीत असलेबाबतची लेखी स्वरूपात तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्री.गुणवरे यांनी दाखल केली आहे. यामध्ये मागील दोन वर्षापासुन मोरगाव परिमंडळामध्ये वारंवार वनक्षेत्रात वनक्षेत्रपाल शुभांगी लोणकर, वनपाल पाचपुते, सहा.वनसंरक्षक मयूर बोठे या वनकर्मचार्यांच्या आशिवार्दाने वृक्षतोड करून कोळसा तयार केला जात आहे असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ग्लिरीसिडीया निर्मुलन करून वृक्षरोपण करण्याच्या योजनेच्या नावाखाली वनक्षेत्रातील मौल्यवान वृक्ष तोडून त्यापासून लाकडी कोळसा तयार करण्याचे ठेका देवून ग्लिरीसिडीया काढण्याचे अनुदान वनक्षेत्रपाल, वनपाल यांनी लाटले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सदर ग्लिरीसिडीया काढून त्याचे गट लावून शासकीय नियमाप्रमाणे लिलाव होणे अपेक्षित असताना कोळसा तयार करणार्या ठेकेदाराकडून वृक्षतोड करून उलट त्यासोबत भागीदारी करून कोळसा तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गेली 2 महिन्यांपासून बारामती वनपरिक्षेत्रात मोरगाव वनपरिमंडळमध्ये मौजे काळखैरेवाडी येथील गट नं.510/1 मध्ये वनक्षेत्रपाल शुभांगी लोणकर, वनपाल पाचपुते, सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या संगनमताने सुमारे 5 हेक्टर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्यापासून कोळसा तयार करून शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान व भ्रष्टाचार केला आहे.
बारामती वनपरिक्षेत्रात गेली 5 ते 7 वर्ष झाले तरी एकाच जागी राहुन शासनाचे नुकसान व भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांची बदलीच होत नाही. या अधिकार्यांचे मोबाईल ट्रेस केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर पडू शकतो. याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती देवून याबाबत संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल गुणवरे यांनी सांगितले.