संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
सध्या रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा या पिकांची काढणे पूर्ण झाली आहे. गहू पिकाची काढणी चालू आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसण्याचे चित्र आहे. पुणे विभागात सरासरी २७ हजार ६२५हेक्टर पैकी १७ हजार ४११ हेक्टरवर म्हणजेच ६३ टक्के पेरणी झाली आहे. मका भुईमूग बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. हरभरा पिक घाटे परिपक्वतेच्या अवस्थेत असून ४० टक्के क्षेत्रावर काढणे झालेली आहे.
करडई सूर्यफूल तीळ पक्वतेच्या अवस्थेत आहेत. उन्हाळी हंगामातील मका बाजरी भुईमूक, सोयाबीन पिकाची ६४६८ हेक्टरी क्षेत्र पेरणी झालेले आहे.
उन्हाळी हंगाम मका बाजरी व भुईमूग पिकाचे ४६५९ हेक्टरी क्षेत्रावर पेरणी झालेले आहे. उन्हाळी मका पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती चांगली आहे. भुईमूग पिकाची उगवण झाली असून पीक परिस्थिती चांगली आहे.