प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचवली येथील शिंदे वस्ती परिसरात राहणाऱ्या दुर्योधन मिंढे यांच्या पत्नी कोमल मिंढे यांना वारंवार होत असणाऱ्या कौटुंबिक त्रासाला कंटाळून त्यांनी रागाच्या भरामध्ये स्वतःच्या दोन मुलांची हत्या केली तसेच पतीवर ही प्राणघातक हल्ला करून स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
शनिवारी दिनांक 8 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेली असून दोन मुलांच्या हत्या करून नवऱ्यावर प्राण घातक हल्ला पत्नी कोमल यांनी केला.
मुलगा शंभू व पियू हे झोपेत असताना त्यांचा आईने गळा व तोंड दाबून हत्या केली व पती दुर्योधन झोपेतच असताना मानेवर डोक्यावर तीक्ष वार करून गंभीर जखमी केले व स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेमध्ये पती व कोमल बचावले असून दोघे गंभीर जखमी आहेत. तसेच पती दुर्योधन यांना बारामती येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचार चालू असून कोमल यांना पोलिसांनी खून प्रकरणी ताब्यात घेतलेले आहे तसेच पुढील तपास पोलीस यांचा चालू आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिलेली आहे.
दुर्योधन मिंढे हा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून खराडी येथील एका खाजगी कंपनीत काम करत असून तो सध्या घरूनच कामकाज करीत होता. दोन्ही पती-पत्नी उच्चशिक्षित असतानाही वरील दुर्दैवी प्रकार घडल्याने अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेने स्वामी चींचोली परिसरात पसरली असून कोमल हिच्या निर्दयीपणाने दोन मुलांना जीव गमावा लागला असून या प्रकरणाला पती-पत्नी मधील घरगुती वादाची किनार असली तरी हत्याकांडापर्यंत प्रकरण गेल्याने पोलीस या प्रकरणाचा कसा तपास करीत असून दोन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गोरख मलगुंडे घटनास्थळी उपस्थित राहून अधिक तपास करीत आहेत.