प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार (भाऊ) गोरे साहेब यांची आज भेट घेऊन गावोगावी “कुस्ती आखाडा बांधकाम” विकासकामात समाविष्ट करून बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
कुस्ती हा पारंपरिक खेळ असून त्याला मोठा वासरा देखील लाभलेला आहे, अनेक युवक या खेळात सक्रिय आहेत. तथापि, योग्य सुविधा नसल्यामुळे स्थानिक पैलवानांना सरावासाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत. कुस्ती हा ग्रामीण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा खेळ असून, त्याद्वारे युवकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. प्रत्येक गावाच्या यात्रा व जत्रांमध्ये कुस्ती आखाड्यांचे आयोजन केले जाते. परंतु कुस्ती आखाडा बांधकाम करण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याने आखाडे बांधकाम करण्यासाठी मोठ्या अडचणी येत असून, अत्याधुनिक कुस्ती आखाडा उभारण्यासाठी हे बांधकाम ग्रामविकास योजनेंतर्गत समाविष्ट करून निधी उपलब्ध करून दिला तर गावातील युवकांना खेळासाठी उत्तम संधी मिळेल व कुस्ती क्षेत्रात अधिक प्रगती होईल.
त्यामुळे गावोगावी “कुस्ती आखाडा बांधकाम” विकासकामात समाविष्ट करून बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी आमदार श्री महेश दादा लांडगे उपस्थित होते.