महा आवाज News

डिकसळ येथील तरुण शेतकऱ्यांनी राजेंद्र पवार यांचे केले आगळे वेगळे स्वागत

इंदापूर प्रतिनिधी:-विजयकुमार गायकवाड..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029
इंदापूर: बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान गावोगावी  मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे भिगवण परिसरातील गावोगावी भेट घेत असताना  डिकसळ  येथे पै.ऋषिकेश अनिल काळे या सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला भोपळा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्या विषया राबवलेल्या धोरणाचा आज शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवार ( ता.१) रोजी बारामती ॲग्रो कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे भिगवण परिसरातील डाळज पोंधवडी ,कुंभारगाव, मदनवाडी, भिगवण ,भिगवण स्टेशन डिकसळ, तक्रारवाडी आदि गावात भेटी दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णू देवकाते, पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, राष्ट्रवादी भिगवण शहराध्यक्ष हेमंत निंबाळकर, दौंड तालुका शिक्षक सोसायटीचे माजी सभापती आजिनाथ भोंग, महेंद्र सवाने, अर्जुन सूर्यवंशी, भास्कर काळे, सुभाष चव्हाण, चंद्रकांत हगारे, संजय भादेकर,शितलकुमार हगारे, सुधिर रांधवन, दीपक काळे, संपत काळे,शरद काळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा