महा आवाज News

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे श्रीराम विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

इंदापूर प्रतिनिधी: संजय शिंदे

बातम्या व जाहिरातीसाठी  संपर्क  :9373004029

भैरवनाथ शिक्षण संस्था संचालित श्रीराम विद्यालयात सन 2001 साली माध्यमिक शालांत परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करणाऱ्या तसेच सन 1991 ते 2001 इयत्ता 1ली ते 10 वी च्या माजी विद्यार्थ्यांचा  माजी विद्यार्थी मेळावा 21 एप्रिल  रोजी साजरा करण्यात आता. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले, विविध शहरातून आलेले एकूण 35 माजी विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सदर वर्गातील काही दिवंगत विद्यार्थी यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
   
या प्रसंगी शाळेचे तत्कालीन  मुख्याध्यापक श्री. शितोळे सर, तत्कालीन शिक्षक श्री खुरंगे सर, श्री गाडे सर तसेच श्रीराम विद्यालयातील कार्यरत कर्मचारी वर्ग आणि जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन शिक्षक श्री साबळे गुरुजी व श्रीमती साबळे बाई उपस्थित होत्या.
त्यानंतर उपस्थित शिक्षक यांच्यातील सेवा ज्येष्ठ शिक्षक श्री. साबळे सर यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मोहिनी शिंदे-नलावडे यांनी केले.
1991 ते 2001पर्यंत कार्यरत असलेल्या उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर सर्व माजी विद्यार्थी यांनी आपला परिचय करुन दिला. तसेच शालेय जीवनातील आपल्या काही गोड आठवणी सांगितल्या. तसेच काही विद्यार्थ्यांनी आम्ही आज जे काही आहोत ते शालेय शिस्तीमुळेच तसेच या शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या संस्काररुपी शिदोरी मुळेच आम्ही आज समाजात सन्मानाने जगत आहोत.
तत्कालीन मुख्याध्यापक श्री. शितोळे सर यांनी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नवीन विनाअनुदानित शाळा सुरू करताना आलेल्या संकटाना सामोरे जाताना केलेले प्रयत्न त्याला पालकांची मिळालेली साथ या सर्व बाबी आपल्या मनोगतात सांगितल्या. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. माजी विद्यार्थी भेटले कि नेहमीच आनंद वाटतो.
तसेच श्री. खुरंगे सर यांनी आपल्या मनोगतात तुम्ही जे काही करत आसल, जिथे कोठे असाल तिथे प्रामाणिक राहा, कष्ट करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री. गाडे सर यांनी जीवनात संघर्षाशिवाय पर्याय नाही आपण आपल्या भूतकाळात केलेल्या संघर्षामुळे आज एक यशस्वी नागरिक म्हणून नावारूपास आले आहात. या शब्दात त्यांनी माझी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
तसेच श्रीमती साबळे बाई यांनी त्यांनी आमच्या सुजाण नागरिक म्हणून घडविण्यास केलेल्या आठवणी सांगितल्या. सरतेशेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. साबळे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या संस्कारांमुळेच विद्यार्थी एक सुजाण नागरिक म्हणून नवारुपास येतात.
तसेच शाळेच्या शिस्तीमुळेच नवीन पिढी शिकते, पुढे जाते व आपला विकास करते.
सर्व माजी विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञा व्यक्त केली त्याचे आभार मानले.तसेच माजी विद्यार्थी यांनी शाळेस Led टीव्ही सेट भेट म्हणून दिला
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी श्री. सुधिर वेताळ सर यांनी केले.
 उमेश राजपुरे यांनी आभारप्रदर्शन केले.

इतरांना शेअर करा