प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: – 9373004029..
दौंड तालुक्यातील रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली सर्रासपणे अवैध धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून सर्रास अवैध धंदे चालू असल्याने या भागात दिसत आहे. अवैध धंदेवाले यांनी आपली दुकाने राजरोज पणाणे खुले आम थाटली आहेत. रावण गाव खडकी ते भिगवण या दहा की मि दरम्यान सरास मोठ मोठे झुगारीचे अड्डे चालु केले आहेत. हया जुगारी वरून रोज भाडन तटा चालु असतो.
आताच खडकी येथे एका हाॅटेल वरती गॅस चोरी करत आसताना हाॅटेल चालक ना पत्रकाराने पकडले आसता फोटो का काढले म्हणुन पत्रकाराना बेदम मार हान झाले.

तरी देखील पोलिस यंत्रणा अवैध धंदेना परवानगी देत आहे. सरास
पुणे सोलापूर हायवे वरती खडकी आनेक अवैद्य धंदे चालू आहेत. रावणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने दौंड, रावणगाव पोलिसांचे काम संशयास्पद आहे, दरम्यान बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा, पोलिस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नाहीत.कोण पोलिस आमचे कोणीसुद्धा काही करू शकत नाही आम्ही महिन्याला पोलीसांना हप्ता देतो असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. हे धंदे करणाऱ्या एखाद्या हॉटेल वरती माहिती व फोटो काढण्या साठी गेले आसता पत्रकार जर बातमी करण्यासाठी गेला त्याला देखील दमदाटी केली जाते. तसेच त्यांच्या वरती खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी भिती दाखवली जाते. ह्या लोकांनी तालुक्यातील काही प्रतिष्ठित लोकांना जवळ करून आपला धंदा जोमात थाटला आहे.

पोलिस प्रशासनाने वेळीच यांना लगाम नाही घातल्यास याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहेत. या बेकायदेशीर अवैध धंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र बघ्याची भुमिका घेत आहेत त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदे वाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे नागरिक बोलत आहे.खडकी येथे बाळु मामा मंदिराचा शेजारीच पत्र्याच्या सेड मध्ये रात्रभर झुगार चालु आसतो. लाखो रूपायाची रात्रीत उलढाल होत असते.
स्वामी चिंचोली तर रोडच्या पुणे सोलापूर हावेलगत हाॅटेल दर्शन शेजारी पत्र्याचा खोलीमध्ये सकाळी 12 वाजले पासुन रात्री 12 वाजेपर्यंत चालु आहे. असे नागरिक सांगत आहेत.
पोलिसांना कोणी तक्रार केली तर पोलिस सुद्धा रेड मारायला जायचे आधिच फोन कुरून सागतेत तुम्ही बंद करा आणि पोलिस जाण्याआधिच सगळ बंद केले जाते. पोलिस अवैध धंदेवालेना सहकार्य करत आहे. आसे नागरीकांन मद्धे जोरदार चर्चा चालु आहे..
