महा आवाज News

मटका अड्ड्यांवर दौंड पोलिसांनी कारवाई..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील देवळगाव येथे ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर दौंड पोलिसांनी कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला.
बुधवारी (ता. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

बबलू किसन सूर्यवंशी रा. देऊळगावराजे, ता. दौंड गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार असिफ नबीलाल शेख यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देऊळगावराजे परिसरात बबलू सूर्यवंशी हा ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर माहितीच्या अनुषंगाने जाऊन पाहणी केली असता सूर्यवंशी हा विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी ओळखीच्या नागरिकांना जुगार खेळवीत असताना आढळला.

दरम्यान, याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

इतरांना शेअर करा