दुष्काळी परिस्थितीमुळे मिरचीचे भाव आभाळाला.
संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
दुष्काळी परिस्थितीत कडक उन्हाळा मिरचीच्या रूपाने महागाईचा ठसका सामान्यांना बसणार आहे तब्बल सहा वर्षानंतर मिरचीचा चांगलाच भाव मिळत आहे.
सध्या उन्हाळा चालू होताच भाजीपाला बाजारात लवंगी मिरचीची आवक घटलेली पाहायला मिळत आहे.
घाऊक बाजारात उच्च प्रतीच्या मिरचीला ९० रुपये तर हलक्या प्रतीच्या मिरचीला 70 रुपये किलो भाव मिळत आहे.
ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये लवंगी मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो विशेषतः बिर्याणी पुलाव भजी ठेचा आधीसाठी लवंगी मिरचीचा वापर केला जातो येथे हॉटेल , उपग्रहातील पदार्थांसाठी तसेच अंडा भुर्जी, चिकन, टिकिया शेव, शेजवान चटणीसाठी वापर होताना आपण पाहता याशिवाय लग्न सोहळ्यामध्ये मसाले भात व इतर भाज्यांमध्ये मिरजेचा वापर केला जातो लवंगी मिरचीची झणझणीत असल्याने भाजीला वेगळीच चव असते.
यंदा पाणी कमी असल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांनी पाहिजे तशी मिरचीची लागवड केली नाही मुळात दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वच भाजीपाल्यांची आवक कमी आहे परिणामी एप्रिल व मे महिन्यात मिरची सह भाजीपाल्यांचे भाव वाढू शकतील.
2019 मध्ये प्रथम सलंगी मिरचीला १२० रुपये किलोचा भाव मिळाला होता सध्या किरकोळ बाजारात मिरचीचे शंभर रुपये किलोने विकली जात आहे.
बाजारात हैदराबाद येथील सितारा व जाड मिरची विक्रीसाठी येत आहे गेल्या दोन महिन्यापासून मिरचीचा भाव खात आहे.
मिरची लागवडीसाठी एकरी 80 हजार खर्च येतो त्यामध्ये मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपर औषधांचा खर्च मजूर रोपे फवारणी सह सुमारे 80 हजार रुपये खर्च येतो एका एकरात साडेसात हजार मिरचीची रोपे लावली जातात मिरचीवर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव न झाल्यास एकरी वेस्टर्न मिरचीचे उत्पादन होते.
गेल्या दोन वर्षापासून मिरचीवर ब्लॅक थ्री व्हायरल चा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पहिल्या दोन तोंड्या वाया जातात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होत आहे.