प्रतिनिधि :- सुधीर पाटील…
आटपाडी ता. १७ रोजी भूपाळगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राज्यभर सर्व स्तरावर ‘राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे’ कार्यक्रमांतर्गत स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने किल्ले भूपाळगड (बाणूरगड) येथे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख सेवक नरवीर बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व प्रबोधन करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख नरवीर बहिर्जी नाईक यांची येथे समाधी आहे. शूरवीर नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस अभिवादन करून स्वच्छता मोहीम सुरू झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव (दादा)पाटील, खानापूर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा सरचिटणीस अविनाश चोथे, विटा शहराध्यक्ष भगवान पाटील, करंजेचे उपसरपंच हणमंत माने, अनिल माने, अशोक माने, चंद्रकांत जाधव, अजित काटकर, किरण हसबे, चैतन्य भोसले, महादेव मंडले, अशोक सावंत, नागेश निळे, सुनील गायकवाड, सचिन पडळकर व खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.