महा आवाज News

भिगवन पोलिसांनी बेकायदेशीर रित्या अफुची शेती करणाऱ्या शेतकऱ्या वर केली कारवाई.

प्रतिनिधी: संजय शिंदे

भिगवण पोलीस स्टेशन यांनी बेकायदेशीर रित्या अफुची शेती करणारे इसमावर केली कायदेशीर कारवाई त्याचे ताब्यातुन १६३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे अफुची झाडे किंमत रूपये ३,२४,८००/- चा मुदद्देमाल केला हस्तगत

भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश बावकर, सहा. पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनचे हददीत अवैध धंदे यांचेविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करीत असताना त्यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे शेटफळगळे, ता. इंदापुर, जि.पुणे गावचे हददीत जमीन गट नंबर.६५ मध्ये इसम याचे स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या अफु झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे .

अशी माहीती मिळाल्याने तात्काळ पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडुन पुर्व परवानगी घेवुन तसेच भिगवण चे मंडलधिकारी दिपक कोकरे ,तलाठी दराडे, कृषी अधिकारी सरडे यांना बोलावुन घेवुन योग्य त्या पोलीस पार्टीसह सदर ठिकाणी जावुन छापा घातला असता सदर ठिकाणी जमिनी मध्ये अफुची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याचे निर्देशनास आले. त्यामुळे सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करून १६३ किलो ९०० ग्रॅम वजनाची अफुची झाडे किंमत रूपये ३.२४,८००/- किंमतीचा मुदद्देमाल जप्त करून भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा. रजि. नंबर ११०/२०२४, एन.डी.पी.एस. अक्ट कलम ८,१५,१८,४६ प्रमाणे दिनांक ०९/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला.सदर गुन्हयाचा पुढील तपास रूपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक, हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पंकज देखमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण,
सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली संदेश बावकर, सहा. पो. निरीक्षक, रूपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमदालर प्रदीप नलावडे, विजय लोडी, रणजीत मुळीक, अंकुश माने, प्रसाद पवार, महीला पोलीस अंमलदार सारीका जाधव, कल्पना वाबळे यांनी केली आहे.

इतरांना शेअर करा