महा आवाज News

भिवंडीतील समाजसेवक नागेश निमकर यांचा कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज..!

आटपाडी प्रतिनिधी:- सुधीर पाटील …
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
आटपाडी :भिवंडी शहर आणि ठाणे, कोकणातील नागरी समस्या निवारणासाठी भिवंडीतील प्रसिद्ध समाजसेवक नागेश किसनराव निमकर यांनी गुरुवारी कोकण आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे विधान परिषद कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत रमेश भावसार, दिलीप गायकवाड, शंकर कालेकर, सागर दीवार आदी समर्थक उपस्थित होते. नागेश निमकर हे विधायक कामांसाठी जाणले जातात.
यासह शासनाच्या अनेक पॉलिसीवर त्यांनी काम केले असून या क्षेत्रात त्यांना दांडगा अनुभव आहे. तसेच मंत्रालय, विधानसभा व केंद्र शासन आणि महाराष्ट्र प्रशासनाच्या संबंधित नागरिकांची अनेक कामे मार्गी लावल्याची माहिती निमकरांनी दिली आहे.

इतरांना शेअर करा