प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029 .
आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भिगवण यांचे वतीने आयोजित निबंध स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ
शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी अ. भा. मराठा महासंघाचे संस्थापक कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात संपन्न झाला.
या स्पर्धेत भिगवण पंचक्रोशी व परिसरातील टाकळी, खानवटे, डिकसळ, राजेगाव, निमगाव केतकी, भवानीनगर, सनसर, खडकी, स्वामी चिंचोली, बारामती, रावणगाव येथील शाळा व संबंधित महिला शिक्षकांनी स्पर्धेत भाग घेतला. सुमारे ४०० महिला स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत खुल्या गटात सौ. अनुराधा विजय मोरे (टाकळी), सौ. मंदाकिनी श्रीकांत करे आणि श्रीमती संगीता प्रदीप बोगावत (भिगवण) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस तर सौ. निर्मला रमेश मचाले, (सनसर) व सौ. आकांक्षा नटराज ढेरे, (भिगवण) यांना उत्तेजनार्थ चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. आठवी ते बारावी या मध्यम वयोगटाती कु. वैष्णवी पंढरीनाथ सोनवणे (नागेश्वर विद्यालय शेटफळगढे ), कु. स्नेहल अनिल आटोळे (आदर्श विद्या मंदिर भिगवण) व कु. मयुरी गणेश काळे, (खानवटे) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. या गटातील उत्तेजनार्थ चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे बक्षी कु. शिवानी विश्वजीत गोरे (भैरवनाथ विद्यालय भिगवण) व कु. सानिका गणेश कदम (आदर्श विद्यामंदिर भिगवण) या विद्यार्थिनीला देण्यात आले. चौथी ते सातवी पर्यंतच्या लहान वयोगटा कु. अक्षरा अशोक शेळके, कु. प्रणाली धनंजय नलवडे (खानवटे) व कु. अंकिता गोपाळ क्षिरसागर या मुलींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकात बाजी मारली. या गटातील कु. श्रद्धा हरिदास काळभोर (काळभोर वस्ती, खडकी) व कु. स्वरा रघुनाथ आगवन (विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण) या मुली उत्तेजनार्थ बक्षीसाच्या मानकरी ठरल्या.
या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित महिलांच्या हस्ते पारितोषक वितरण आले.दीपक रतन कुंडलिक वाघ, सचिन सुनंदा हरिदास पाटील, सौ. उज्वला वैभव वाघ-पिसाळ (देशमुख), निलेशकुमार पुष्पा नवनाथ चांदगुडे, प्रा. बाळासाहेब बबई भानुदास खरात व प्रा. शाम हिराबाई लक्ष्मण सातर्ले यांनी या स्पर्धेतील परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धकांच्या वतीने सौ. अनुराधा मोरे, परीक्षकांच्या वतीने प्रा. सातर्ले व सौ. उज्वला वाघ तर वाचनालयाचे वतीने अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर वेळी मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी कोंढरे साहेब यांनी तयार केलेल्या पुढचं पाउल या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर वेळीं कृषी सहायक म्हणुन नेमणूक झालेले संदिप बापुसाहेब जगताप यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता साळुंके व आभार प्रदर्शन ॲड ज्योती जगताप यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी अ. भा. मराठा महासंघ पुणे विभागीय संघटक राजकुमार मस्कर, मुख्य सल्लागार डॉ. जयप्रकाश खरड, वाचनालयाचे कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष dr अजय थोरात भिगवण शाखाध्यक्ष छगन वाळके, कार्याध्यक्ष डॉ. संकेत मोरे, खजिनदार अशोक साळुंके, उमेश दिडवळ, भरत मोरे, बाळासाहेब ननवरे, ग्रंथपाल दादा रणसिंग यांनी केले होते. या प्रसंगी निबंध स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक व त्यांची नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.