संपादक:- पल्लवी चांदगुडे..
पद्मावती जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामती लोकसभा संघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांना निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विधानभवन येथील पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीतील तळमजल्यावर सुरू करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचा दूरध्वनी संपर्क क्रमांक ०२०-२९९९१५३८ आणि आचारसंहिता व नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९९२०६८ असा असून नागरिकांनी निवडणूक विषयक माहिती अथवा तक्रारीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माध्यम कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक ०२०-२९९९२०६६ असा आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी कळविले आहे.