प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात नियुक्त क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आणि तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत उप विभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे आयोजित करण्यात आले.
श्री.नावडकर म्हणाले, मतदान प्रकियेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट व कंट्रोल ईव्हीएम प्रथम स्तरीय तपासणी (एफएलसी), द्वितीय स्तरीय तपासणी (एसएलसी) बाबत संपूर्ण माहिती घ्यावी. मतदान यंत्राची काळजीपूर्वक जोडणी करावी. निवडणुकीदरम्यान सर्व साहित्य काळजीपूर्वक ताब्यात घेवून त्याचा सूचनेप्रमाणे उपयोग करावा. मतदान प्रक्रीयेबाबत उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधीस माहिती द्यावी.
तहसीलदार श्री.शिंदे यांनी मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरूप मतदान (मॉकपोल), ईव्हीएमचे बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तसेच व्हीव्हीपॅट बाबत विविध टप्प्यावरील तपासणी विविध नोंदवह्या, मतदानाच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन, ८५ वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्याकरीता देण्यात येणाऱ्या टपाली मतदानाची सुविधा आदीबाबत माहिती दिली.
सासवड शहरात मतदान जनजागृती फेरी
सासवड शहरात सासवड नगरपरिषदेमार्फत शहरात नगरपरिषदेपासून शिवतीर्थ चौक, नवप्रकाश चौक, अमर चौक, चांदणी चौक, भैरवनाथ चौक, कोडीत नाका, पालखी तळ मैदान परिसर मार्गे मतदान जनजागृती फेरी (रॅली) आयोजित करण्यात आली.
रॅलीत मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, शाळांचे शिक्षक, समन्वय अधिकारी अधिकारी पायल पोमण, स्वच्छता निरीक्षक मोहन चव्हाण यांच्यासह वीर बाजी पासलकर शाळा, सावित्री बाई कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज शाळा, इंदिरा गांधी शाळा, संत नामदेव शाळा आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात घोषवाक्य स्पर्धा
नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात बरटी स्टिचिंग केंद्र, धनकवडी, पुणे येथे विद्यार्थ्यांची घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाचे आवाहन करणारी घोषवाक्ये काढली.