महा आवाज News

उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप, यावेळी डॉ. रेवती संत, डॉ. अक्षय जरांडे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. जगताप यांनी शासकीय रुग्णालयामधील सेवा व रुग्णकरीता असलेल्या शासकीय योजनांबाबत माहिती देऊन गतवर्षी बारामतीतील एकूण ३९१ क्षयरुग्णांचे यशस्वीरित्या निदान करण्यात आल्याचे सांगितले. समाजामधील दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्याबाबत आवाहनही त्यांनी केले.

डॉ. संत यांनी क्षयरोगाबाबतची गांभीर्यता लक्षात घेऊन रुग्णांनी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

इतरांना शेअर करा