बारामतीत निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला.
संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
पूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चा चालू आहे ती बारामती लोकसभा मतदार संघ निवडणुकीची. कुठे घड्याळ तर कुठे तुतारी.
मात्र बारामती मतदारसंघातील तसेच बारामती तालुक्यातील अनेक गावांना असणारा पाण्याच्या अडचणी कडे मात्र घड्याळाचे आणि तुतारी चे दुर्लक्ष.
ग्रामीण भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. पिण्यासाठी दररोज गंभीर ते किरकोळ भांडणे करण्याचे वेळ ग्रामस्थांवर आलेले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर बारामती लोकसभा मतदारसंघात पिण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
बारामती तालुक्याच्या अनेक भागांमध्ये बऱ्हाणपूर, उंडवडी, सावंतवाडी, मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबे खुर्द, जोगवडी, लोणी भापकर, बाबुर्डी, खराटे जळगाव, सुपे, जळगाव क. प, करा वाघचपर्यंत अशा अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून देखील घड्याळ व तुतारी पक्षाचे दुर्लक्ष या गावांकडे आहे.
मग फक्त मतदानाच्या वेळेसच मतदान मागायला येतात का आणि मग फक्त मतदानाच्या वेळेसच मतदान मागायला येतात का आणि विकास कामाकडे मात्र दुर्लक्ष करतात का अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये चालू आहे.
जनावरांसाठी पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही शेतीसाठी पाणी नाही मग जगायचं ते कशावर ते हा मोठा प्रश्न ग्रामस्थांच्या पुढे आहे. व्हेरी कोरडे पडलेले आहे नाले नदी बंधारे आटलेले आहेत पक्षांची ही पाण्यासाठी मोठी तडफड दिसत आहे.
राज्यात बस स्थानकापासून ते प्रशासकीय इमारतीबाबत एक मॉडेल ठरलेले बारामती मतदारसंघ मूलभूत सुविधा पुरविण्याच्या बाबतीत मात्र मागे का अशी चर्चा पूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना अजून पिण्याचे पाणी पोटभर मिळत नसल्याची खंत बारामती तालुक्यात आहे.