प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए (सी.ए.) विभागाच्या वतीने आय.आय.टी. बॉम्बे संलग्न स्पोकन टीटोरिअल कार्यशाळा आयोजित केली होती.
महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बी.ए.स्सी (कॉम्पुटर) या विभागातील २२० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेच्या अंतर्गत Advanced C++, HTML आणि Git या कोर्सचे आयोजन करण्यात आले. स्पोकन ट्युटोरियल कोर्स हे स्वयं-अभ्यासासाठी उपयुक्त असून, विद्यार्थी आपल्या सोयीनुसार, कुठूनही आणि कधीही शिकू शकतात. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना डेटाबेस व्यवस्थापन, डेटा संरचना, डेटा संचयन, वेब साईट डिझाइन आणि डेटा प्रवाह यासंबंधी मूलभूत तसेच तांत्रिक ज्ञान मिळाले.
विद्यार्थ्यांनी कार्यशाळेदरम्यान विविध प्रयोग व प्रात्यक्षिके करून सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कौशल्ये आत्मसात केली. त्यांना डेटाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी विविध अल्गोरिदम्स आणि पद्धती शिकता आल्या. याशिवाय, Git च्या मदतीने कोड व्यवस्थापन, कोड शेअरिंग आणि टीम वर्कसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची ओळख झाली.
संगणकीय भाषेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यांचा सराव करण्याची संधी मिळाली, तसेच वेब डेव्हलपमेंट व प्रोग्रामिंगमधील नव्या ट्रेंड्सची माहिती मिळाली. आजच्या डिजिटल युगात महत्त्वपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या कार्यशाळेतून उपलब्ध झाली, ज्यामुळे विद्यार्थी उद्योग क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक बनू शकतील.या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन विभागप्रमुख महेश पवार यांनी केले.
स्पोकन ट्युटोरियल प्रकल्प आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने विकसित करण्यात आल्यामुळे, या कोर्सच्या शिक्षणाची गुणवत्ता उच्च दर्जाची असते.
त्यामुळे हे कोर्स विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले.
कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालसाहेब काशीद, आय.क्यू.ए.सी. समन्वयक नीलिमा पेंढारकर, विभागप्रमुख महेश पवार आणि विभागातील प्राध्यापक यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, विभागप्रमुख महेश पवार, स्पोकन टीटोरिअल आय आय टी बॉम्बे महाराष्ट्राचे समन्वयक विद्या कदम यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेसाठी अनिल काळोखे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील विशाल शिंदे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, कांचन खिरे, वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम यांची विशेष परिश्रम घेतले.