प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बदलव जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लघु व कुटीर उद्योग विकास प्रशिक्षण कार्यशाळा गुरूवारी पार पडली.
या कार्यशाळेत महाराष्ट्र न्यूज 24 तास चे मुख्य संपादक व लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक उपचंद शेलार यांनी महिला प्रतिनिधी व बचत गटाच्या माध्यमातून कोणते प्रॉडक्ट तयार करावयाचे आणि स्वयंरोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच बँक ऑफ इंडियाच्या फायनान्शियल मॉडरेटर पल्लवी यांनी बँकेमार्फत उद्योगांना आर्थिक सहाय्य योजना याविषयीचे मार्गदर्शन केले.
बारामती उपविभागाचे डीवायएसपी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शक्ती अभियान पथकाच्या अधिकारी वनिता कदम यांनी पथकाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा,महिलांचे हक्क व संरक्षण याविषयी माहिती दिली.
यावेळी उपविभागातील शक्ती अभियान पथक उपस्थित होते. शहराध्यक्ष जय पाटील वर्किंग जर्नालिस्ट ऑफ इंडियाचे जीवन धोत्रे ,
अशोक मोरे,पत्रकार स्वप्निल कांबळे,
मन्सूर शेख,बोरकर,वैशाली अकिवाटे राष्ट्रवादी सोशल मिडीया विभागाचे बारामती शहर अध्यक्षा विजयालक्ष्मी अल्लीगी , सोनाबाई काळे , मीनाताई गोरे , मनिषा नायडू, निशा साळुंखे, स्वाती घोले, वैष्णवी गायकवाड, कुंदा चव्हाण , कांबळे ताई, नसीम बागवान , मंदा अमृळे, विजया जाधव , कविता खरात, आदी मान्यवरांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी झाली.
या कार्यशाळेचे आयोजन बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रा.सलीम बागवान सर यांनी केले. बारामती शहर व तालुक्यातील शेकडो महिला भगिनींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.